Nautrari 9 Colours 2025 and Devi pooja

Nautrari 9 Colours 2025 and Devi pooja । 

नवरात्री चे नऊ रंग आणि देवीची पूजा ।भारतीय संस्कृती ही अनमोल आहे. अशा  संस्कृतीतील बहारदार सण म्हणजे नवरात्र उत्सव. शक्तीस्वरूप देवींच्या नऊ रूपांची भक्ती, पूजा नवरात्री मध्ये केली जाते. त्या नऊ दिवसात प्रत्येक दिवसाचा एक विशिष्ट रंग असतो. आपण Nautrari 9 Colours and their Importance । नवरात्री चे नऊ रंग आणि त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व  आहे. त्याची सामाजिक,संस्कृतिक आणि अध्यात्मिक माहिती आपण लेखामधून जाणून घेणार आहोत. Nautrari 9 Colours

या नऊ दिवसांच्या नऊरात्री या माता दुर्गा देवीची पूजा करत आपण साजरा करणार आहोत. भारतातील वेगवेगळ्या भागात ही परंपरा अलौकिक पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. देवीच्या अध्यात्मिक स्वरूपाशी एकरूप होण्याचा आणि श्रद्धेचा हा विषय आहे.

चला तर मग जाणून घेऊ नवरात्री २०२५ च्या चे ९ रंग Nautrari 9 Colours and Devi pooja । नवरात्री चे नऊ रंग आणि देवीची पूजा ।

नवरात्र दिवस पहिला : पांढरा रंग २२ सप्टेंबर २०२५

   पांढरा रंग हा शांततेचे आणि पवित्रतेचा रंग आहे. या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते.पांढरा रंग हा नव्या सुरुवाती साठी शुभ मानला जातो. यात शुद्धता आणि निर्मळता हे महत्त्वाचे गुण आहेत. अनेक शुभकार्यात पांढरे वस्त्र घालायची करण्याची परंपरा आहे. शांती आणि श्रद्धा म्हणून पहिल्या दिवशी पांढरा रंग परिधान करावा.

 शैलपुत्री देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांपैकी पहिले रूप मानले जाते. ती हिमालय पर्वताची मुलगी आहे अशी आख्यायिका आहे. तिचं नाव शैलपुत्री असं पडलं आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या देवीची पूजा केली जाते.

नवरात्र दिवस दुसरा लाल रंग २३ सप्टेंबर २०२५

Nautrari 9 Colours 2025
Nautrari 9 Colours 2025

  लाल रंग हा ऊर्जा धाडस आणि सुंदरतेचे प्रतीक आहे. लाल रंग हा सौभाग्य दर्शवतोदर्शवतो. लाल रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो. कधी कधी लाल रंग हा चला म्हणूनही वापरला जातो जसे की सिग्नल, रेल्वे अपघात रोखण्यासाठी अंगाचा कपडा पुरेसा असतो. क्रोध आणि युद्धाच्या वेळी लाल रंगाने दिला जायच. स्त्रियांना लोभनीय असणारी  लाल रंगाची साडी सर्वांना आकर्षित करते.

 रात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. या देवीची उपासना केल्याने त्याग, तप, संयम आणि वैराग्य यांची सिद्धता होते. ब्रह्मचारी देवी देवीचं दुसर रूप मानले जाते. ऊर्जा आणि अंतरिक्षक्तीचे उगमस्थान देवी आहे. यावर्षी लाल रंगासोबत देवीची उपासना केल्याने निश्चित आनंद मिळेल.

नवरात्र दिवस तिसरा निळा रंग २४ सप्टेंबर २०२५

Nautrari 9 Colours 2025
Nautrari 9 Colours 2025

निळा रंग हा शांतता व समृद्धी दर्शवतो. निळ्या रंगांमध्ये स्थैर्य आहे आकाशाची अमर्यादता आहे. समुद्र ही निळा आहे असे आपण म्हणतो. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी निळा रंग परिधान करणे हा आनंददायी एक क्षण होऊ शकतो. आपल्या देशाचा तिरंगा त्यात असलेल्या निळ्या रंगाचे चक्रही देशाची प्रगती दर्शवते.

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघटा मातेची पूजा केली जाते. या दिवशी देवीला दुधाच्या पदार्थाचा प्रसाद चढवणे शुभ मानले जाते. देवीचा मंत्र पूजा करते वेळी उच्चारल्याने आंतरिक शांती आणि समाधान भक्तांना मिळते. चंदन आणि फुले अर्पण केल्याने घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. चंद्रघटा माता ही देवी पार्वतीचे रूप आहे. देवीच्या मस्तकावरील घंटेच्या आकाराच्या अर्ध्या चंद्रवरून तिचे नाव आहे.

नवरात्र दिवस चौथा रंग पिवळा  सप्टेंबर २०२५

Nautrari 9 Colours 2025
Nautrari 9 Colours 2025

पिवळा रंग हा उत्साह, नवीन आशा आणि आनंदाचे प्रतीक आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी रंग पिवळा परिधान करावा. पिवळा रंग सर्वांना प्रसन्न करतो व सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करतो. देवीला प्रसन्न करण्यासाठी पिवळा रंग परिधान केल्याने श्रद्धा जोपासली जाते. गरबा खेळण्यासाठी हा रंग शोभून दिसतो पिवळा रंग हा अंधारातही लवकर दृष्टीत येतो.

कुष्मांडा देवी नावरात्री मधील देवीचे चौथ रूप आहे. देवीच्या पूजेणे दुख , कस्ट आणि रोग दूर होतात अशी मान्यता आहे. सुख संपत्ति प्राप्त होण्यास देवीचा आशीर्वाद मिळतो. या देवीच्या स्मित हसयातून विश्वाची निर्मिती झाली आहे अशी आख्यायिका आहे. देवीचे वाहन सिंह आहे आहे. पूजा साहित्यात तूप वापरुन दिवा  लावावा .

नवरात्र दिवस पाचवा रंग हिरवा ६   सप्टेंबर २०२५

Nautrari 9 Colours 2025

हिरवा रंग हा निसर्ग आणि  प्रतीक आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी रंग पिवळा परिधान करावा. पिवळा रंग सर्वांना प्रसन्न करतो व सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करतो. देवीला प्रसन्न करण्यासाठी पिवळा रंग परिधान केल्याने श्रद्धा जोपासली जाते. गरबा खेळण्यासाठी हा रंग शोभून दिसतो पिवळा रंग हा अंधारातही लवकर दृष्टीत येतो.

स्कंदमाता देवी दुर्गा मातेच नवरात्रीचे पाचवे रूप आहे. भगवान कारतीकेय हे या देवीचे पुत्र आहेत . पाचव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते.  कौटुंबिक कल्याण आणि आनंदासाठी देवीची पूजा करावी. या दिवशी देवीला झेंडूची पिवळी फुले पूजेत अर्पित करावीत. देवीला चार हात आहेत दोन हाताने बालरूप कारतीकेय ला घेऊन देवी बसलेली आहे. तिसऱ्या हात वरमुद्रा घेऊन आणि चौथा हात कमळ पुष्प घेऊन आहे.

नवरात्र दिवस सहावा राखाडी रंग ७    सप्टेंबर २०२५

काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या मिश्रणाने हा राखाडी रंग तयार होतो . या रंगत स्थिरता आहे शांती आणि सूसंस्कृतपणा या रंगमध्ये दिसतो. कला आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात हा रंग आवडता आहे. हा रंग तटस्थ आहे हा इतर रंगावर आपला अधिकार गाजवत नाही . इतर रंगासोबत सहज जुळाऊन घेणार राखाडी रंग आहे. काही ठिकाणी हा उदासीनता देखील दर्शवतो. सहाव्या दिवशी राखाडी रंगाचे कपडे परिधान करण्याची प्रथा आहे.

  सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा करतात . देवीला साक्षात सूर्य नारायणची बहीण मानल जात.  पूर्व भारतात छत पूजेच्या वेळीही कात्यायनी देवीची पूजा केली जाते. नावदुर्गेचे हे सहावे रूप दैवी न्यायासाठी ओळखले जाते. देवी ही स्वतः एक यौद्धा आहे अशी मान्यता देखील आहे.  पूजेच्या कलश भोवती लाल फुले आणि लाल कुंकू मिसळून तांदूळ ठेवावे.  दृढनिश्चय आणि शक्ति देवीच्या भक्तीने प्राप्त होते.  Nautrari 9 Colours 2025

नवरात्र दिवस सातवा – केशरी  रंग 8   सप्टेंबर २०२५

Nautrari 9 Colours 2025
Nautrari 9 Colours 2025

हिंदू धर्मात सर्वोच्च स्थानी असलेला रंग “केसरी”. ऊर्जा आणि नाव चैतयानाचे प्रतीक महणजे केसरी रंग. नावरात्रीत सातव्या दिवशी केसरी रंग परिधान केला जातो. या रंगत अनंत सकारात्मक ऊर्जा स्थायी रूपात आहे. भक्तांना नेहमी प्रिय असलेला केसरी रंग हा इतिहासाचा महत्व जपणारा रंग आहे. उत्साह आणि आशावाद केसरी रंग पहिल्याने मिळत असतो. केसरी रंग हा भक्तीचेही प्रतीक आहे.

   सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. नकरात्मकता निराश ,भीती पासून मुक्ती मिळण्या साथी देवीच्या या रीपाची पूजा करावी. कालरात्री हे देवीचे सातवे रूप आहे. हिम्मत देऊन जीवनातील संकट दूर करणारी देवी म्हणूनही ओळख आहे. देवीचा रंग कला आहे पान भक्ताच्या जीवनात तेज प्रकाश वाढवत असते. गुलाबाचे फूल देवीला अत्यंत प्रिय आहे पूजेच्या समनामध्ये अवश्य असावे.

नवरात्र दिवस आठवा  –मोरपंखी रंग २९ सप्टेंबर २०२५

Nautrari 9 Colours 2025
Nautrari 9 Colours 2025

मोरपंखी रंग हा अद्वितीय व्यक्तिमत्वचे प्रतीक आहे. हिरव्या आणि सोनेरी रंगाच्या एकत्र आल्यावर  मोरपंखी रंग तयार होतो. मोऱ्याच्या पंखाचा रंग म्हणून याची ओळख आहे. हा सुंदरता, वाढ आणि शांतता दर्शवतो. हा रंग परिधान केल्याने ताजेपानची भाव निर्माण होते. सुंदरता आणि सौन्दर्य या रंगत वसलेली आहे. हा रंग शुभ मनाला जातो आणि पार्वती देवीला देखील हा प्रिय रंग आहे. Nautrari 9 Colours 2025

 नवरात्रीचा दिवस आठवा हा महागौरी मातेच्या पूजेसाठी समर्पित आहे. यात देवीच्या व्रताची कथा देखील वाचली जाते. देवीला शुभ्र रंगाचा प्रसाद दिल जातो.नवदुर्गा पैकी देवीचे हे आठवे रूप आहे. शंख आणि बेलपत्र वाहिल्याने देवी प्रसन्न होते असा मानल जात. देवीच्या पूजा केल्याने पापा पासू मुक्ती मिळते आणि सुभ फळ प्राप्त होते.

नवरात्र दिवस नववा  –  गुलाबी रंग ३०  सप्टेंबर २०२५

Nautrari 9 Colours 2025
Nautrari 9 Colours 2025

गुलाबी रंग हा सुंदरतेच प्रतीक आहे. आपुलकी प्रेम आणि एकता ही भावना या रंगात आहे. लाल रंगाचीच फिकट छत असलेला हा रंग आहे. या रंगत आऱ्योग्य निरागसता यांचा समावेश होतो. गुलाबी रंग प्रेम प्रणय आणि जवळीकही दर्शवतो. गुलाबी रंग हा स्त्रीत्वशी संबंधित आहे असेही मानले जाते. या नवरात्रीच्या नवव्या दिवशी गुलाबी रांगेचे कपडे घालावेत.

नवव्या दिवशी सिद्धीदात्री मातेची पूजा केली जाते. सिद्धीदात्री देवी अस्टसिद्धी ची देवी आहे आहे. सर्व कार्यांत सिद्धता प्राप्त होण्या साठी देवीची पूजा करावी. देवीच्या फोटो ची पूजा मांडून देवीला नारळ अर्पित करावा आणि फूल वाहावीत.

मराठी ब्लॉग डॉट इन कडून शारदीय नवरात्र उत्सव आणि विजय दसमीच्या सर्वांना खूप शुभेचहा…

Raad More…

Scroll to Top